माय
माय
1 min
248
तुझ्या मायेचा सागर
का गं आटला आटला...
साद देती चिल्लंपिल्लं
का गं दुरविसी त्यांना...
काय सांगू सखे तुला
माझी ही दुर्दशा
संसार गं बाई माझा
असा फाटला फाटला...
गोड सानुली गं पोर तुझी
अनाथावाणी गं जगती ...
घे कुशीत गं त्यांना
लाव माया...
नको बाई असं जिणं
आश्रमात जगू दे
पाहून आनंदी त्यांना
हर्ष मनी गं वाटला...
सांग सखे याच
दिवसाकरिता तू का
संसार थाटला...
