माय मराठी
माय मराठी
1 min
233
स्वराज्याच्या ललकारीमध्ये,
सह्याद्रीच्या प्रत्येक दरी-खोऱ्यामध्ये,
वारकरीच्या वारी मध्ये,
ज्ञानेश्वर, मुक्ताई, तुकोबाच्या ओवीं मध्ये माय मराठी ।।
आयुष्यात पहिल्यांदा बोलतांना भेट झाली ती माय मराठी,
आयुष्यतली पहिले बोबडे बोल म्हणजे माय मराठी.
काळ्या मातीतील लेकांचा आवाज म्हणजे माय मराठी,
खेड्या-पाड्यातील नाती जपणे म्हणजे माय मराठी,
आजी चुलीवरची भाकरी करतांना म्हणते त्या ओव्या म्हणजे
माय मराठी
अनेक रूपांनी नटलेली माझी मराठी,
र्हस्व, दीर्घ, उकार, मात्रा, वेलांटी, यमक, अलंकार ने नटलेली माय मराठी
आमचे भाग्य महान आम्हा लाभली माय मराठी
