STORYMIRROR

Amol Dilip Pawar

Others

4  

Amol Dilip Pawar

Others

आलास तु!

आलास तु!

1 min
382

गेली दोन वर्षे तुझ्यासाठी 

अवघी सृष्टी व्याकूळ झालीय.... 

तिच्यासाठी धावत आला,

आता तिला कचकचून मिठी मार... 

एका क्षणात तिचा

सगळा दाह विरघळून जाईल.

येताना चोर पावलांनी नको, 

राजासारखा

सनई चौघडे वाजवत ये...

येता-येता सगळ्यात आधी

शेतातल्या एखाद्या घरात डोकाव...

तू आल्याचं कळताच

तिच्या काळजात चर्र होईल... 

एरवी आभाळातून बरसणारा तू 

तिच्या डोळ्यांतून बरसशील...

ती तुला मनातल्या मनात 

एखादी कचकचीत शिवीही देईल, 

पण तरी पण तिथे थांब... 

कारण तिचा धनी गेल्यावर 

पोराबाळांसकट सगळ्या

संसाराचा गाडा तिलाच ओढायचाय...

म्हणूनच तिच्या शेतात सगळ्यात आधी जा...

आणि

तिथल्या मातीत रुजून राहा..


Rate this content
Log in