STORYMIRROR

Prajakta panari

Others

3  

Prajakta panari

Others

माय माझी मराठी

माय माझी मराठी

1 min
208

कशी वर्णू महती तुझी 

छोट्या छोट्या या शब्दांत 

तु तर माय माऊली माझी 

बालपणी निजवले अंगाईने 


थकल्या वाटेवरी तूच तर

येसी माझा हात धरायला 

प्रेरणा जागवून मनी शब्दांतून 

तुच मला शिकविले लढायला 


स्पर्श मायाळू लागून तुझा 

ममता भरली वाणीत माझ्या 

तु येता ओठी माझ्या 

बळ येई नव्याने हसत देही 


काना, मात्रा अन वेलांटीचा 

शृंगार करून नटली तू 

म्हणूनच रसिक होती शब्द 

देऊन अर्थ नवा नवासा मजला 


Rate this content
Log in