STORYMIRROR

Prajakta panari

Others

3  

Prajakta panari

Others

तु येता आकस्मिक

तु येता आकस्मिक

1 min
122

मिठीतले रंग येती तुझ्या सवे सवे

डोलती रे वृक्ष भासे मयुरची नाचे

थेंब थेंब तुझे मना देती सूर नवे

थेंब थेंब तुझे मना देती सूर नवे 

अंतरंगी दडलेला आवाजची बोले

आकाशही सवे गडगडत ची बोले

गार गार गारांसवे गारवा पसरे

मनावरी भावनांची नगरीच उतरे

कधी जाई आठवांच्या नावेत बसूनी

कधी येत मायेच्या हाकेस ऐकूनी

थेंब थेंब तुझे मना देती सूर नवे


Rate this content
Log in