STORYMIRROR

राधिका राठी

Others

4  

राधिका राठी

Others

मातीच्या घरामंधी

मातीच्या घरामंधी

1 min
331

मातीच्या घरामंधी 

शेणाचं पोतारं,

माय रांधिते चुलीवर 

गोड मांडला संसार 


घराच्या सज्ज्यावर 

भरे पाण्याचं मडकं,

चिवचिव ये, पाणी पी 

माय लाविते हाक


आली गं चिऊताई 

आली ती ओट्यावर,

माय रांधिते चुलीवर 

गोड मांडला संसार 


मायाळू मायबाप 

जणू दुधावरची साय,

गोंडस गायी - म्हशी 

वाड्यात माज्या हाय 


श्वास फुंकिते चुलीत 

माय भाजते भाकर,

माय रांधिते चुलीवर 

गोड मांडला संसार 


बाप पुरवितो लाड 

माय तोंडात घास भरी ,

सोडुनी अशी मायेची मूर्ती 

जाऊ कशी मी सासरी


Rate this content
Log in