" मातीच्या घरामंधी "
" मातीच्या घरामंधी "
1 min
386
मातीच्या घरामंधी
शेणाचं पोतारं ,
माय रांधिते चुलीवर
गोड मांडला संसार
घराच्या सज्ज्यावर
भरे पाण्याचं मडकं ,
चिवचिव ये ,पाणी पी
माय लाविते हाक
आली गं चिऊताई
आली ती ओट्यावर ,
माय रांधिते चुलीवर
गोड मांडला संसार
मायाळू मायबाप
जणू दुधावरची साय ,
गोंडस गाई - म्हशी
वाड्यात माज्या हाय
श्वास फुंकिते चुलीत
माय भाजते भाकर ,
माय रांधिते चुलीवर
गोड मांडला संसार
बाप पुरवितो लाड
माय तोंडात घास भरी ,
सोडुनी अशी मायेची मूर्ती
जाऊ कशी मी सासरी ...