माती
माती
1 min
200
कुंभाराची माती
मातीपासून घडा
फुटता घडा
घड्याची माती ॥१॥
मातीत बी
बी पासून झाड
झाडाला फुलं
फुलापासून बी
पडता खाली
मातीतच बी ॥२॥
मातीचा देह
देहरूपी माणूस
येता मरण
देहाची माती ॥३॥
मातीशी नातं
दृृढ हे किती
क्षणभंगुर जीवन
हव्यास तो किती
कळत नसे तर
डोक्यातही माती ॥४॥
