माणूस...
माणूस...
1 min
315
माणूस बनवताना देवाच्या मनात नेमके होते तरी काय
त्याने दिले माणसाला फक्त दोन डोळे, दोन हात आणि दोनच पाय... ..
घडवले त्याने माणसाला जसे कुंभार बनवी फिरत्या चाकावरती घडा
माणसाला तरी त्याची किमंत नाही म्हणतो कोण रे तो देव वेडा...
देवाने विभागले त्याला दोनच गटात जे कि स्त्री आणि पुरुष
स्वतःला हुशार समजून माणसाने त्याला पुढे अजून दिले धर्म आणि जातीचे स्वरूप
आपल्या आपल्यातच भांडून माणूस करून घेतो स्वतःच्या डोक्याला ताप
(कधी विचार केलाय का मुर्खानो )
स्वतःच्या मुलांचे जीव जाताना पाहून रडत नसेल का तो वरती बसलेला बाप...
स्वतः मातीत राहून सुद्धा दुसर्यांच्या जिभेवर साखर वाटोत तो म्हणजे ऊस
तसेच स्वतःसाठी न जगता आपले आयुष्य दुसर्यांच्या नावी करणारा
तोच आहे देवाने घडवलेला खरा माणूस...
