माझ्यात मी सुंदर आहे
माझ्यात मी सुंदर आहे
1 min
466
मी आई, बहीण
आजी, काकू, मामी
मावशी, आत्या
बायको अथवा मैत्रीण
असेल कोणीही तुमच्यासाठी
तरी माझ्यात मी खास आहे
तुम्ही बघा उपभोग्य वस्तू म्हणून खुशाल
तरी माझ्या क्षमतांची मला जाण आहे
तुम्ही नावे ठेवा माझ्या आधुनिक पहेरावाला बिनधास्त
तरी माझ्या कर्तव्यांचे मला भान आहे
तुम्ही करा भेद काळी-गोरी, जाड -बारीक, तरुण-म्हातारी असे कितीही
तरी माझ्यात मी सुंदर आहे
माझ्यात मी सुंदर आहे
