STORYMIRROR

Nanda jadhav social worker

Others

3  

Nanda jadhav social worker

Others

माझ्या आठवणीतला पाऊस

माझ्या आठवणीतला पाऊस

4 mins
185

मी आणि पाऊस 


येरे येरे पावसा तुला देतो पैसा, 

पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा,


परंतू आता पैसा झाला मोठा आणि पाऊस झालाय खोटा 

अस सर्वजण तुला बोलालायला लागलीत रे

आणि अगदी असाच वागायला लागलास ह..... 

अरे काय हे तुझे वागने तुला पटत का? 

कधी कधी एवढ्या लौकर तर कधी 

तुझी वाट बघुन डोळे जनू मिटायची वेळ येते


किती हा उन्हाळा किती गरम होतय आणि 

थोडस तू येण्याची तयारी केलीस की फार बर वाटत

काय वाजत गाजत तुझे आगमन होतय रे 

जनू काही स्वर्गातील ईद्रं, मेनका, ब्रम्ह, विष्णु, महेश, 

हे अगदी आनंदाने नाचू लागतात बघ फटाक्यांचा आवाज 

फुलबाज्यांचा लख लख प्रकाश आणि मग 

धो धो धो तुझे आमच्यावर तुटुन पडने


कधी तर सतत तुझी पिरपिर तर कधी किती रे धो धो 

मला तर तुझे वागने खुप विचित्र वाटायला लागते पण खर सांगू तुला 

तुझे ते पहिल्यांदाचे धो धो येने मला खुप आवडते बघ 

मग तुझ्या सोबतचा तो सोसाट्याचा वारा 

ते काळेकुट् आभाळ असे ते चकचक करणारे वीजांचे प्रकाश त्यातूनच 

त्या बगळ्यांच्या लांबलचक रांगा च रांगा 

नंतर कुठे ते मोत्या सारखे तुझे थेंब आणि 

मग जो मन मोहक असा सुगंध.....ओ हो हो....


व्वा काय तो नाचनारा मोर 

आपला पिसारा फुलवुन नाचतोय 

तुझे ते थेंब झेलतांना तो किती 

आनंद व्यक्त करतोय व्वा काय छान वाटत रे ..... 


अस वाटत एकदम आग ओकनारी गरम वाफ, 

ती पन खुप थंड झालीये जणू काही 

एकदम तिचा रागाचा पारा शुन्यावर आलेला आहे

आणि मलाही सांगतेय की घे ग मजा या अनमोल क्षणांची बघ बाहेर 

सप्त रंगांनी मोहरलेला हा निसर्ग आणि बघ 

ईद्रंधनुचे सात रंग कसे अगदी अलगद तुझ्या हातात येतील एवढे जवळ 

आणि खरोखर काळजाचा ठोका चुकावा असा तो गडगडाट ओ......


 मी मला हरवुन कधी तुझ्या त एकरूप होउन जाते 

दुर दुर तुझ्या गावात ते कळलेच नाही.

 बघावे तिकडे आनंदाने ते बेडुक सुध्दा ईकडुन तिकडे 

उड्या मारत असतात जनु काही 

डरा्व डरा्व करून आपल्याला सांगत असतात की

घे हा आनंद भरून तुझ्या पण मनात

आता तुझे धो धो धो येने काही थांबत नाही पन मला घरी जायचय ना रे

आणि मग बघ तुझे ते खळखळून भरलेले तुडुंब नदी नाले ....... 


पन तू खुप छळतो रे कधी कधी नको तेव्हा येतो 

पाहीजे तेव्हा येत नाहीस का रे तु असा 

आता तुला सांगू पावसा तू ना कधी कधी एवढा रागवतोस 

की बिच्या-या शेतकरी दादांचे जे डौलदार आलेले पिक असत 

ना ते शेतकऱ्यांचे स्वप्न असत रे अगदी जीव ओकून 

फुलवलेल असत ते लेकरागत जपत असतात रे त्याला 

आणि ते मग तुझ्या रूद्र रूपाला बघुन 

तुझ्या सोबतच निघुन जात रे बाबा.. 


आणी तू नाही आलास ना तरीही 

ते तुझी वाट बघुन तोंड सुकुन

माना टाकुन देतात रे

असा नको ना करत जाऊ 

कसली रे ही असी जिवघेनी मस्करी करतोस

अरे एक ना तु जेव्हा लपंडाव खेळतोस की नाही

त्या वेळी आमचे हे शेतकरी दादा कि नाही

तुझ्या खुप विणवन्या करतात रे 


खुप वाट बघतात तुझ्या येण्याची तुझ्या साठी 

देवाला साकड काय घालतात तुझ्या साठी 

त्या मारोती रायाच्या डोक्यावर पाणी टाकत काय बसतात, एवढच काय तो

देवाचे देव महादेव त्यांनासुध्दा पाण्यात बुडवतात आणि विनंती करतात 

पावसाला पाठवा हो महादेवा


तु गंमत बघत असतोस ना वरतुन 

मला माहित आहेत रे तुझ्या ह्या खट्याळ खोड्या

तुला आता यायचे आहे तुझ्या आगमनाची वेळ झालीय 

आणि मी वाट पहातेय कधी निरभ्र आकाशात एकदाचे मेघ दाटुन येतील 

भर दुपारीच सांजवेळ वाटेल, 

तो गोड वारा सुटेल 

आणि तो ईद्रंधनू मला भेटेल...... 

आपसुकच मग ओठांनवर गान गुनगुनल जात..... 


पावसाच्या धारा येती झराझरा, 

झाकळले नभ सोसाट्याचा वारा, 

रस्त्यांणी ओहळ जाती खळखळ, 

जागो जागी खाचांन मधे तुडुंबले जळ, 


कारण मला पन भिजुन चींब चींब व्हावस वाटत रे 

तुझ्या सोबत लहान होऊन खुप खुप नाचाव बागडाव वाटत.

तो ढगांचा गडगडाट विजांचा चमचमाट ओहो काय ती थंड हवा.

तुझा स्पर्श हवा हवा कोकीळेचा आवाज कुहू कुहू ऐकायला नवा नवा.

अस्स बेधुंद वातावरण 

किती छान ना, 

आणि मग सगळी कडे ते छोटे छोटे उगवनारे गवत 

आणि पायाला लागनारी मउ मखमली ती माती  

ते झाडांवर किर्रररररर करनारी आणि डोळांना न दिसनारे रान किड्यांचा आवाज

आणि दुर कुठेतरी तो शेतकरी.

सर्जा राजा ची जोडी नांगराला लाउन हाकतोय आणि असी जोरात आरोळी देतो ओ हो....... ओ हो हो


माझ्या राजा र माझ्या सर्जा र

चल बिकी बिगी तू नांगरा र

भरलया आभाळ चिक्कार

आलाया पाऊस बघ फार

माझ्या राज्यार माझ्या सर्जा र

 

करूया मशागद दमदार 

होतील ढेकळ ती भुरभुर

मग टाकुया पेरूण रान सार

येतो या पाऊस सरसर 

माझ्या राज्यार माझ्या सर्जा र


आलिया काभारीन शेतावर

घेऊन कांदा न भाकर 

करूतुया न्याहारी बसुन बांधावर 

कर तू बीआराम घटकाभर

माझ्या राज्यार माझ्या सर्जा र 


डोलतय पिक कस डोलकर

भरल्यात कनस ती शानदार

मन माझ सुखावलय बघ फार

केलीस कुरपा तू पावसा र

माझ्या राज्यार माझ्या सर्जा र


आणि अस तु शहान्या सारखा वागलास की नाही मग तुला शेतकरी छान शाब्बासकी देतो तुझे धन्यवाद मानतो 

मग आता तू कसा छान वागशील ना ?

काय रे कधी कधी तुला बघ अजीबात दया येत नाही 

तुझ्या धो धो येन्याने डोगर सुध्दा घाबरतो रे

पार खाली येतो आणि मग बघत सुध्दा नाही, कुठे कोन गाव शिवार.निरापराधी जिव जातात खुप वाईट वाटत हे बघुन रे 

एवढा का तुला राग येत असावा..... 

थोडा शांत पणे येत जा मला आवडत तुझ धो धो येन म्हणुन काय एवढ पन घाबरवायच बर वाटत का ते 

तुला आता लक्षात ठेवायचय 

पैशाला खोट करूण तुला मोठ व्हायचय....... 

आणि शेतकऱ्यांच्या ओरोळ्या ऐकायला.

कोनच नाही रे तुझ्या भरवशावर पैसा शेतात फेकुन रात्री बिछान्यावर पडुन तुझ्या

 कडे बघत उघडे डोळे ठेउन आपल्या झोपडीतून त्या विशाल अशा आभाळाकडे बघत झोपलेला असतो बघ, 

खुप मोठ्या मनाचा राजा हाय बघ शेतकरी.

फक्त कष्ट करत असतो रे तो फळाची आशा ठेउन,

काळ्या आईचा लेक आहे तो, कधीच संकटांना झुकत नाही बघ 

एकच त्याचा निर्धार असतो 

काळ्या आईवर विश्वास असतो त्याचा, काहीना काही देईल माझी काळी आई. 

असा ठाम विश्वास असतो

आणि हे सार तुला सांगतांना बघ माझे ओठ थरथरतात रे शब्दांनी न सांगता मनातल्या माझ्या भावनांना ओळखुन मी तुझे पाहीलेल्या स्वप्नांचे, माझ्या काही सुरा तालांचे तू 

एकशील ना रे.

जानुन घेशील ना माझ्या सर्व आठवनींना.

समजुन घेशील ना...... 

आणि असाच आठवनीत राहाशील ना....., 



Rate this content
Log in