असा एक पाऊस
असा एक पाऊस
आयुष्यात कितीतरी पावसाळे अनुभवलेले असतात.
आपणही कुनाचे काही उपदेश ऐकत असतो त्या वेळी माणुस सहज बोलून जातो
ऐ तुझ्या पेक्षा चार पावसाळे मी ज्यास्तच पाहिलेत.
असेच खुप पावसाळे मी ही पाहिलेले आहेत ते सुखकर व दुखकरही.
पण सुखाचे क्षण एवढे लक्षात नसतात पण दु:खद क्षण मात्र चांगलेच आठवणीत राहातात.
*असाच एक आठवणीतला पाऊस*.
मी साधारण आठ वर्षाची चिमुकली असेल पण आजही ते सर्व दृश्य मला आठवते.
जुन महिन्यातील तो पहिला आठवडा होता
दिवसभर खुप ऊन रणरणत होते.
असे कुठेही वाटत नव्हते की आज पाऊस येणार आहे असे.
आमच्या दारात एक आंब्याचे झाड होते त्या दिवशी आंबे उतरवन्या साठी काही लोक
आली होती.
झाडावरची काही आंबे काढुन झाली होती ती आंबे विस ते बाविस हजार फळ होती.
तेवढी आंबे आम्ही चार भावंडांनी व आईने मिळुन घाई घाई घरात आणुन भरली होती.
बाहेरील वातावरण खुप खराब दिसत होते.
फार वेगाने वारा सुटलेला होता.
आभाळ काळेकुट्ट झालेले होते साधारण चार वाजले असतील परंतू खुप अंधार झाल्या सारखे वाटत होते.
हळू हळू वार्याचा वेग वाढतच चालला होता.
आमचे घर असे साधे कुडा मातिचे आणि वरती पाचटाचे छपर असलेले ते घर होते.
शेजारी जांभळीचे मोठ्ठे झाड होते
त्याला एवढी जांभळ लक्कडलेली होती की बघायलाच नको काळेशार जांभळही असे रसदार मदाळ आणि खुप गोड होते.
वार्याने सर्व जांभळ जमीनी वर पडून सडा झाला होता.
त्याच झाडाखाली गुरांचा गोठा होता गाईचे वासरू (खोंड) गोट्यात बांधलेले होते बाकी चे जनावर मोकळेच होते.
थोड्या कोंबड्याही होत्या
त्या पन बाहेरच फिरत होत्या
वार्याच्या झोकाने त्या उडत चाललेल्या दिसत होत्या.
आता खुप जोराचा पाऊस सुरू झाला होता.
तसे आम्ही सर्वजन घरात जाउन दरवाजा बंद करून एका ठिकाणी गोळा होउन उभे राहीलो होतो.
आता घर वार्याने उडेल की पडेल ही भीती सर्वांनाच वाटत होती.
वारा तर एवढा जोरात होता की आम्ही घाबरून गेलो होतो.
जांभळीच्या फांद्या कडाकड मोडुन पडत होत्या तो आवाज कानावर येत होता
विजांचा आभाळाचा आवाज कर्कश्य कानाचे पडदे फाडत होता.
आता पावसाने खुपच जोर धरलेला होता भयानक वार्यामुळे आमचे घर कड कड कड.....आवाज करून आमच्या अंगावर कोसळले होते.
त्या घरातुन कसे बसे आम्ही बाहेर निघण्याचा प्रयन्त करत होतो.
त्या प्रयत्नाला यश आले व आम्ही बाहेर निघालो.
सर्वीकडे बघतोय तर काय झाडे मोडुन पडलेली होती
तिकडे गुरांचा गोठा पन मोडुन पडलेला होता
त्या गोट्या खाली गाई चे वासरू दबलेले होते.
आम्ही सर्वांनी मिळुन त्या वासराला बाहेर काढले.
पाऊस खुप जोरात होता अंगाला थेंब जोर जोरात लागत होते
जनू काही कोणी वाळूच फेकुन मारावी असे ते पावसाचे थेंब लागत होते.
ऊभ राहायला कुठेही आसरा नव्हता कारण आम्ही शेतात राहायला होतो.
साधारण चार तास पाऊस कोसळत होता थंडीने जिव जायची वेळ आलेली होती.
त्यात ते गाई चे वासरू थंडीने थडथड उडत होते.
आमची आई व आम्ही चार भावंडांना आणि त्या वासराला जवळ घेउन उभी होती. अशातच शेजारच्या वस्ती वरून एक हाक ऐकू आली ओ.....नानी पोरांना घेउन इकडे या....
आमच्या आईला ते नानी म्हणायचे
आवाज एकुन बरे वाटले
आई व आम्ही त्या गाईच्या पिलाला घेउन तीकडे निघालो.
जमीन पावसाने मउ झालेली त्यात पाय गाढत होते पाऊस खुप जोरात होता तसेच आम्ही तिकडे निवार्याला पोहचलो.
तिथे त्यांनी खुप मोठी शेकोटी केली होती आम्ही सर्वजण बाजुने बसुन एक सुटकेचा स्वास सोडला.
आता पाऊस थोडासा कमी आला होता.
त्या प्रसंगात आमचे वडिल घरात नव्हते गाव थोड दुरच होते कारण काही आणायचे असले तर गावात जावे लागायचे
नेहमी प्रमाणे वडिल काही आणायला गावात गेले व इकडे आमच्यावर वार्या पावसाने असा वर्षाव केला होता.
वडिल आले तेव्हा थोडा अंधार पडलेला होता साधारण सात वाजले असतील.
जोरात किंकाळी ऐकायला आली
वडिल सर्व दृश्य पाहुन हादरून गेलेले
त्याना वाटले घराच्या खाली सर्व दबलेले असावेत.
ते बघुन जोरात टाहो फोडला वडिलांच्या त्या हंबर्डाची किंकाळी ऐकू आली.
लगेचच आई पन जोरात आवाज देउन सांगू लागली आम्ही सर्व ठीक आहोत.
नंतर आम्ही सर्व जन रात्रभर तीकडेच राहीलो सकाळी उठुन लौकर नविन घर बनवायला चालू केले
बघताबघता परत आमचे घर तयार झाले
पुढे पाऊस ही संत गतीने आमची हिंमत आणि गंमत पहात होता.
अशा संकटांनाही तोंड देउन
आम्ही न डगमगता छान पैकी
आनंदाने पावसाला बघत राहीलो.
*असा एक पाऊस होता*
आल आल वार न वादळ
घेउन गेल पांघरून चादर
पिठ कुट चटनी मिठ
राहीली नाही काहिच कुठ
जिव हुरहुर मनात काहुर
भिती ने जिव झाले बेजार
संसार पडला उघड्यावर अपेक्षा नवती ही कुनावर
सकाळी उठूनी खोचुन पदर
बंधले आपुले नविन घर
पोरा बाळांना देउन ज्ञान
मुखी भरवले घास दोन
असा तो पाऊस होता छान
आठवण त्याची येते क्षणो क्षण
