माझं पहिलंवहिलं प्रेम
माझं पहिलंवहिलं प्रेम
1 min
310
मलाही झाले एका
सुंदर मुलीवर प्रेम
का झालं? कस झालं?
मला मात्र कळलच नाही,
हरपुन गेलं भान
तिच्या मध्येचं गुंतत होतं,
दूर कुठंतरी स्वप्ननगरीत
घर माझं बांधलं होतं..!!
जीवनाच्या प्रत्येक क्षणाला
साथ तिची हवी होती,
पण तिच्या होकाराची
साद कुठे आली होती..!!
तिची आठवण दिवसातून
प्रत्येक क्षणाला येते बरं का,
मग हृदय माझं धडधडतं
जसा रानावर पडतो करपा..!!
"पण" तिच्यासोबत बांधलेलं
माझं स्वप्नाचं घर तोडणार नाही,
ति माझ्या आयुष्यात येणार किंवा
नाही येणार वाट पाहणे सोडणार नाही..!!
