STORYMIRROR

Anant Deogharkar

Others

3  

Anant Deogharkar

Others

माझीही एक पणती

माझीही एक पणती

1 min
364

घरात पणती ,दारात पणती 

पणती अंगणी, आकाशी

सानथोर न्हाऊनी जाती, 

रंगीबेरंगी प्रकाशी |


सोनपावली आली दिवाळी

रंग मजेचे भरू दे|

उजळाया भोवतालचा तिमिर

माझीही एक पणती असू दे ||


आयुष्याच्या वाटेवरती

सुखदु:खाची असे जोडी |

जगता जगता घ्यावी प्रचिती

सदैव थोडी थोडी |

जीवन असते यांचे संमीश्रण

अर्थ असा कळू दे |

उजळाया भोवतालचा तिमिर

माझीही एक पणती असू दे ||


झगडणे चाले बारमासी

खडतर जीवनाशी |

साव ठरे चोर इथे

अन्यायाची होते सरशी |

हसत हसत सामोरे जाण्या

बळ अंगी येऊ दे |

उजळाया भोवतालचा तिमिर 

माझीही एक पणती असू दे ||


शौर्याचा वारसा जपूनी 

रक्षित होवो आजादी |

सस्यश्यामला भारतभूमी

जतन करू आबादी |

श्रमसाफल्याची शिदोरी 

अविरत साथ देऊ दे

उजळाया भोवतालचा तिमिर

माझीही एक पणती असू दे ||


रित्या हातांना काम लाभू दे

धनसंपदा वाढू दे |

कर्तव्याच्या नंदनवनी

कीर्तिसुगंध दरवळू दे |

जीवनगाणे गाता गाता

जीवन सारे उजळू दे

उजळाया भोवतालचा तिमिर

माझीही एक पणती असू दे ||


जातीपाती, दुष्ट चालीरीती

मळभ त्यांचा सरू दे |

धर्मधर्म एक होऊनी

मैत्र जीवांचे बनू दे |

जीवनपथकंटक दूर सरोनी

मने प्रफुल्लीत होऊ दे | 

उजळाया भोवतालचा तिमिर 

माझीही एक पणती असू दे ||


Rate this content
Log in