माझी...
माझी...
1 min
190
कविता करतो मी
घेऊन हातात लेखणी
आहे बहिण माझी
हजारो लाखात देखणी
जसे चंद्राचे रूप
पौर्णिमेच्या दिवशी तसे
दिसे तिचे रूप
हर एक दिवशी
सकाळच्या प्रहरी
पक्षी गातात गाणी
तशीच असे तिची
मधुर - गोड वाणी
आहे माझी बहिण
अनमोल एक मोती
इतर हिऱ्या - मोत्यांची
तिच्यापुढे काय गिनती
