माझी व्यथा
माझी व्यथा
म्हणुन म्हनतो देवा नेतो का आता तरी,
कष्ट केले खुप झाली माझीच लाचारी,
सात तळाची माळी बांधुन मिचं झालो भिकारी,
ऋद्धपणात आता फिरतो आहे वारी,
म्हणुन म्हनतो देवा नेतो का आता तरी,
पोर ,बाळ गेली दूर देशी तुचं माझा कैवारी,
बायकोला सुद्दा तुचं नेलं तिची नव्हती रे तयारी,
पोट नाही भरत शिळ्या भाकरीच्या तुकड्याने,
येवढ कस काय बदलत शाळा लय शिकल्याने,
माझा मिचं आहे यालाही जबाबदार,
पोराला लय शिकऊन त्याला केल तहशीलदार,
लेकीचं आता करुन टाकलं लग्न,
ति पण झाली तिच्या संसारात मग्न,
काठी घेऊन हातात फिरतो लोकांच्या दारी,
म्हणून म्हनतो देवा नेतो का आता तरी..,
सुन पण मिळाली लेकी सारखी माझ्या,
पण लेकी सर नाही येत नखाला तिच्या,
रुपया दोन रुपयात पोट माझं भरतं,
ऐकच इचारतो देवा माझं वय कधी सरतं..,
मी ऐकटाच नाही देवा अपेक्षा करतोय मरणाची,
माझ्या सारखे अनेक आहेत वाट पाहताय सरणाची,
म्हणुन म्हनतो देवा नेतो का आता तरी...!!
