माझी कविता
माझी कविता
माझी कविता आज काल
खुपचं झाली हट्टी,
काल पासुन माझ्यासोबत
घेतली तिने कट्टी,
काय सांगू राव कविता
गेली दूर निघुन,
ति होती तेव्हा माझी
छाती होती फुगून,
कविता म्हने मला तुझी
वाढली खुप मिशी,
लिहन्यात करुन ठेवली
शुध्द लेखनाची काशी,
काल पासुन शोधतोय राव
येईना लवकर ध्यानात,
गेली कुठे लेखनी माझी शोधतोय
तलवारीच्या म्यानात,
बसली होती रुसून
कोऱ्या कागदा सारखी,
दुरुन मला दिसत होती
खुप जास्त बारकी,
काणा गेला फिरायला
मात्रा गेला पाण्यात,
तेवड्यात पेन लटकला
माझा शाई नव्हती पेनात,
कविता माझी हसली
समोर येऊन बसली,
बोलली माझ्याशी ती
का रे कशी तुझी फसली,
कवितेच्या बाबतित थोडा
मी विचार असा केला,
मनात बोललो आपण होता
का वाल्मिकी चा चेला,
मोबाईल घेतला हाती
बोटांचा केला पेन,
खरचं सांगतो राव तिथे
पुर्ण झाला माझा गेम,
विशाल कविता झाली पूर्ण
आपली खुप जात आहे लांबत,
वाचकांना सुध्दा आवडली
पाहिजे नाहीतर बसु आपण बोंबलत...!!
