STORYMIRROR

Sangita Gurav

Others

3  

Sangita Gurav

Others

माझे बाबा

माझे बाबा

1 min
328

पुन्हा वाटते होऊनी मूल

घुटमळावे बाबांच्या अवतीभवती

हट्ट करूनी पुन्हा बसावे

कोकरू त्यांच्या पाठीवरती !


 डाव उधळावा सोंगट्यांचा 

तसे पांगलो इकडे तिकडे

कसा जमावा मेळ सारा 

रम्मी झब्बू गेले कुणीकडे ! 

  

  पुन्हा मारूनी बैठक पैजेची

  हात पडावा माझा खालती

जिंकतच जावे ,तरूणच रहावे

बाबा हर ऐक वळणावरती !


  कुणी मोडला,कुठे हरवला  

  प्रिय खेळ तो विट्टी दांडूचा

अजुनीआठवतो कधी ना चुकतो

सुरेख झेल ,आंबे पाडतां बाबांचा!


 डाव अर्धवट.... रंगता रंगता.

 बाबांनी का गुंडाळावा ?

  सांगा गोष्टींचा खजाना आता. 

   कुणाकडून धुंडाळावा !


 भन्नाट करावी दंगामस्ती 

राडा उपद्व्याप अन् धुमाकूळ 

पुन्हा बसावा त्यांचा धपाटा

अन् शिव्यांसाठी व्हावे व्याकुळ!

   

इतिहास शिकावा तो बाबांकडूनच

गणितातले तर होते टिळक 

ते मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक

अजुनि आठवतो रूबाब ठळक !


  हृदयातच असतात बाबा 

मी माझ्या मुलांशी खेळतांना

सुरकुत्याही हसतात मग 

पुन्हा दिसतात उमलताना !!


Rate this content
Log in