STORYMIRROR

Sangita Gurav

Others

3  

Sangita Gurav

Others

हरित वारी !

हरित वारी !

1 min
349

लावलंय का हो ?

या जन्मी तुम्ही एक तरी झाड !

केलीत का हो? जाता जाता 

थोडी पुण्याईमध्ये वाढ !


 जपलंय का हो ? त्या झाडाला 

तुम्ही मुलाप्रमाणे फार !

रुजलांय का हो? पिढ्यापिढयांमध्ये 

तुमचा एक विचार !


ठेवलंय का हो ?मागे तुम्ही 

काही सुंदर बहारदार !

झालंय का हो? आयुष्य तुमचं

झाडंच हिरवंगार !


लगडलीत का हो? फळे तयाला

संस्कारशील रसदार  

की बुध्द- शिवबांचे 

पुन्हा एकदा अवतार !


खुशाल मिसळा मग मातीमध्ये!

बीज तुम्हीच हो कसदार!

हक्क जगण्याचा दिला तुम्हाला !

फेडाल का हो? घाम गाळुनि 

या मातीचे उपकार !


 यशकिर्तीच्या कळसावर 

कुणी कोरले ?

नांव तुमचे नक्षीदार !


अशी घडावी अशी रुजावी 

या झाडाची

हरितवारी वारंवार


Rate this content
Log in