क्षितिज
क्षितिज
1 min
347
आकाश जेथे जमिनीला टेकते
त्याला आम्ही म्हणतो क्षितिज
दुरून भासते हे धरतीगगन मिलन
जवळ गेल्यावर काहीच नसते
खरेच आहे हे सारे
आकाश जमिनला भेटायलाच
आलेले असत
हे प्रेमी मिलनात असतात मग्न
आपली चाहूल लागताच
लाजून होतात दूर
पण आम्ही वेडे म्हणतो
हा तर एक भास आहे
हे तर एक क्षितिज आहे
