कशाला उद्याची भीती राहते?
कशाला उद्याची भीती राहते?
कालचे दिवस शाळेचे,
तर आजचे कॉलेजचे,
उद्याचे जीवन मात्र अधांतरीच असते,
मग कशाला उद्याची भीती राहते?
कधी होतासी सखा तुझा,
अन कधी होतासी वैरी,
इथं आजचे नाते उद्या टिकत नसते,
मग कशाला उद्याची भीती राहते?
कालच तर झाली फ्रेंडशिप,
आज पाहतो तर यांची रिलेशनशिप,
अन उद्या मात्र ब्रोकन पार्टनरशिप,
असले रुसवे फुगवे रोजचे च असते,
मग कशाला उद्याची भीती राहते?
उषःकाल होता होता काळरात्र होते,
एका अनपेक्षित आपत्तीने
क्षणात सारं संपून जाते,
मग कशाला उद्याची भीती राहते?
अपयश आले काल,
म्हणून यश मिळेलच आज,
याची काही गॅरंटी नसते,
प्रयत्न करणे एवढंच आपल्या हातात असते,
मग कशाला उद्याची भीती राहते?
काल होता दुष्काळ उन्हाळ्यात,
तर आज महापूर पावसाळ्यात,
यांचे खेळ तर आयुष्यभरासाठीचे,
पण जेव्हा दोघांची जुगलबंदी होते,
आयुष्य सप्तरंगी इंद्रधनुने न्हाऊन निघते,
मग कशाला उद्याची भीती राहते !
