Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sagar Durgule

Others

2.5  

Sagar Durgule

Others

तू सोबत नसताना...

तू सोबत नसताना...

1 min
830


तू सोबत असल्यावर फक्त तुझ्याशीच भांडू वाटतं,

तू सोबत नसताना मात्र तुझी च सोबत हवीहवीशी वाटतं


तू सोबत असल्यावर तुझ्यापासून दूर जावसं वाटतं,

तू सोबत नसताना मात्र तुझ्यातच गुंतावसं वाटतं 


तू सोबत असली की तुझा पार वैताग येतो,

तू सोबत नसताना मात्र माझ्या सावलीत सुद्धा तुझा भास होतो


तू सोबत असल्यावर तुझी किलबिल त्रास देते,

तू सोबत नसताना मात्र भयाण शांतता च जीव घेते 


तू सोबत असताना एकांताची गरज भासते,

तू नसल्यावर मात्र त्याच एकांताची खंत वाटते 


तू सोबत असल्यावर तुझ्यावर हसायला येतं,

तू नसताना मात्र स्वतःवरच रडायला येतं


तू सोबत असताना एक दिवस क्षणात निघून जातो,

तू नसताना मात्र एक एक क्षण युगासारखा भासतो 


आणि खरं सांगायचं तर 

तू सोबत असताना जगण्यामध्ये एक वेगळीच हिम्मत असते,

तू सोबत नसताना मात्र माझ्या आयुष्यालाच किंमत नसते... 


Rate this content
Log in