STORYMIRROR

Vaibhav Patil

Others

3  

Vaibhav Patil

Others

कोरोनामुक्त महाराष्ट्र धावणार

कोरोनामुक्त महाराष्ट्र धावणार

1 min
233

स्वच्छतेची कास बाळगूनी अंगी, कोरोनाला मी हरवणार I

मास्क वापरूनी सदा सर्वदा, आजारा ह्या दूर पळवणार II


सुरक्षित अंतराची गुरुकिल्ली, अंगी कायम मी बाळगणार I

गर्दी करणे अन् गर्दीत वावरणे, कटाक्षाने मी टाळणार II


परिसर अन् घर स्वच्छ ठेवून, नियमित हात मी धुणार I

निरोगी जीवनाची धरलिया कास, नागरिक मी जबाबदार II


स्वच्छता अन् आरोग्याचा निकट संबंध आम्हा कधी कळणार I

शासकीय सूचनांचे पालन करेन, सुरक्षित अंतर मी राखणार II


संसर्ग दिसता आजाराचा, त्वरीत घेणार शासकीय उपचार I

कुटुंब अन् सामाजिक आरोग्याचा, मीच आहे जबाबदार II


चला घेऊ या शपथ आपण, निरोगी महाराष्ट्राचे आम्ही वारसदार I

पुन्हा एकदा नव्या दमाने, कोरोनामुक्त महाराष्ट्र धावणार II


Rate this content
Log in