STORYMIRROR

Vaibhav Patil

Others

4  

Vaibhav Patil

Others

घाबरू नका पण जागरूक राहा

घाबरू नका पण जागरूक राहा

1 min
195

जगभरात साथ आली, करोनाची सुरुवात झाली, 

चीनमध्ये पसरलेल्या, विषाणूची जात आली ..


एका नंतर एक अन, त्यांच्यामुळेच अनेक,

संसर्गाने बाधित झाले, आपल्यातलेच कित्येक ..


कुणी म्हणते मास्क लावा, कुणी म्हणते सॅनिटायझर घ्या,

जिकडे तिकडे फक्त अन फक्त, गो करोना गो करोना ..


माणसाने पसरवलेला विषाणू, माणसालाच डसू लागलाय,

देशानंतर देश अन, माणसांमध्येही घुसू लागलाय ..


हात धुवा स्वच्छ, हस्तांदोलनही नको, 

नमस्काराने भेटा फक्त, उगा संसर्ग नको ..


सर्दी, खोकला, ताप येता, उपचारांची कास धरा, 

आवश्यक असेल तरच प्रवास, अन गर्दीची ठिकाणे टाळा ..


करोनाची भीती आता, समाजातून घालवलीच पाहिजे, 

घाबरू नका पण जागरूक रहा, मनी हेच रुजवले पाहिजे ..


उठा सारे सज्ज होऊ, मुकाबला करण्या करोनाचा, 

बाधा झाली लपवू नका, आधार घ्या आरोग्य सेवांचा ..



Rate this content
Log in