काव्यपुष्प
काव्यपुष्प
1 min
228
वारा घुमतो रानात
ढग ढोल वाजवती
मोती, थेंबांचे टपोरे
पाना पानात नाचती
ऋतू,हिरवा बरवा
सप्तरंग उधळतो
गंध कस्तुरी सुगंधी
तना मनात भिनतो
सृष्टी चिंब ओली झाली
नवं पालवी फुटली
भाव भावना दाटता
छान कविता सुचली
मृदगंध पावसात
रिमझिम जलधारा
शीळ घालतो वनात
होतो अवखळ वारा
मन आनंदे डोलते
मेघ सावळे दाटले
भावनांना भिजवून
काव्यपुष्प गंधाळले
