STORYMIRROR

Geetanjali Satanekar

Others

4  

Geetanjali Satanekar

Others

चढून जाऊ घाट

चढून जाऊ घाट

1 min
169

घाट वळणावर सख्या

निसर्गाचा थाट

हिरवळ पसरली वाटेत

वार हे बेभाट 

इंद्रधनूच्या रंगात 

रंगला घाट

रान फुलांनी सजला

वळणदार घाट

सुगंध प्रीतीचा दरवळला

मोहरला घाट

गालावरची खळी सख्या

पाहते तुझी वाट

ओळखीची जगा आणि

ओळखीचा घाट

हातात हात घालून

चढून जाऊ घाट

गाणी गात प्रेमाची 

पार करू घाट

प्रीत तिथे पाहते

तुझी माझी वाट


Rate this content
Log in