जरासे कळावे
जरासे कळावे
1 min
161
तुझ्या पावलांनी जरासे वळावे,
सुन्या काळजाला जरासे कळावे...
अबोले तुझे तू मनाशी स्मरावे
मनाचे किनारे मनाशी जुळावे...
नव्याने तुला मी मिठीला धरावे
इशारे जुने ते मिठीला मिळावे...
स्वतःला तुझ्या मी हवाली करावे
तुझा हात हाती स्मरूनी जळावे...
