एकतर्फी प्रेम...
एकतर्फी प्रेम...
1 min
214
झुरलेल्या मनात
मंद एकांताचा ठाव घेत,
बेधुंद प्रेमाच्या वाटेवर
प्रवास करणाऱ्या पावलांना
लागलेली ठेच,
काळजाला स्पर्श करते...
तेव्हा..!
डोळ्यांत पाणावलेले ते
गालावर ओघळणारे थेंब,
थरथरत्या ओठांवरती
येऊन थांबतात...
तेव्हा..!
हृदयातून येणाऱ्या
हुंदक्याच्या आवाजालाही
ते ओठ निमूटपणे
सगळं काही गिळतात...
तेव्हा..!
ते झुरणं,तो एकांत..
तो प्रवास,ती ठेच..
तो स्पर्श,ते अश्रू..
अन ते ओठ...
फक्त अन फक्त..!
तिच्याच आठवणीत
निःशब्द होतात...
