STORYMIRROR

Rucha Mahabal

Others

3  

Rucha Mahabal

Others

जननी

जननी

1 min
170

स्त्री ही जननी

स्वयंसिद्धा समाजात वावरते

सुशिक्षित सबळ होऊन

कुटुंबलाही सावरते ।1।


ममतेने पाल्याला संस्कार देते

प्रसंगी रणचंडी होऊन शत्रूस लोळवते

शिलाचे रक्षण करण्यास सदैव सज्ज सावध असते ।2।


घरच्या भल्यासाठी ती सतत 

ती राबत असते 

आपले मन मारून ती कुटुंबासाठी जगते ।3।


सदस्यांच्या या आवडी जपत

साऱ्यांना आनंदी ठेवते 

संसकरांची शिकवण देऊन घराचे नंदनवन करते।4।


पाली चुकल्यास मार्गदर्शन देऊन 

त्यांचा मार्गदर्शक बनते 

आपल्या पतीसह सदस्यांसह

सुंदर जीवन घडवते ।5।


महिलांच्या कर्तृत्वाने जग हे 

विस्मयचकित झाले 

गौरवदीन साजरा करून

तिच्या कर्तव्य पुढे झुकले ।6।


Rate this content
Log in