आयुष्य जगावे हसत खेळत
आयुष्य जगावे हसत खेळत
1 min
256
व्यथा असो की आनंद असो
आयुष्य जगावे हसत खेळत
सुख दुःखाच्या महामार्गातून
जावे हसत मार्ग काढत ।1।
दोष कुणाला न देता
आपलेच कर्म हे समजावे
लाख चूक केल्या तरी
अश्रू न ढळता आशा किरण शोधावे।2।
कधी सेवा बंधन तोडून
नदी सारखे धुंद वहावे
कधी फुलपाखरू होऊन
गगनी सस्वच्छंदी विहरावे ।3।
ऐकला आलो एकलाच जाणार
हे जीवनाचे मर्म समजून घ्यावे
देवाने पाठविले अवनीवर तर
चांगले कर्म करावे, हसत जगावे
हसत जगावे ।4।
