जन्म घेण्याची कधी अपेक्षा.....
जन्म घेण्याची कधी अपेक्षा.....
1 min
264
करणार नाही पुन्हा जन्म घेण्याची कधी अपेक्षा...
स्वप्न पूर्ण करूनी
घेतली मी आज उंच भरारी
बसले वाट राखूनी
हे क्रूर शिकारी....!!१!!
कसे पुढे जाऊ मी आज
नाही हो त्या नराधमांना
कोणत्याही गोष्टींची लाज
पुरूषार्थाचा चढला त्यांना माज....!!२!!
कशी घेऊ उंच भरारी
करून ठेवले आम्हाला अबला नारी
मोकाट सुटला अत्याचारी
फिरतोय मिळेल एक तरी शिकारी....!!३!!
अत्याचार करूनही
मिळतात सुटकेसाठी पायवाटा
शासनाचा विचार केला तर
पुन्हा सापडेल हो एखादी माता....!!४!!
किती दिवस द्यावी स्त्रीने ही परीक्षा
भर चौकात द्यावी नराधमांना शिक्षा
फाशी नकोय मरण यातना द्या त्यापेक्षा
करणार नाही पुन्हा जन्म घेण्याची कधी अपेक्षा
करणार नाही पुन्हा जन्म घेण्याची कधी अपेक्षा....!!५!!
