जिव्हाळ्याचं झाड
जिव्हाळ्याचं झाड
1 min
209
झाड लावावं
'जिव्हाळ्याचं...'
त्याला रोज घालावं पाणी
'प्रेमाचं...'
करत राहावी जोपासना त्याची
आपुलकी अन् आपलेपणाच्या 'खतांनं...'
द्यावा कधी कलम ही त्यांला
तुमच्याच जोड 'मनानं....'
अपेक्षांची फुलं नकोत
प्रति कर्तव्याची यावीत त्याला 'फळं....'
अन् उभ्या नभा खाली पसरावे त्याने
तया सावलीत समृद्ध होईल 'काळ...'
रूजत जाव्यात शाखा त्याच्या
खोल खोल 'गर्भात...'
ठेऊन आलोय ठेवा खाली
असे काही सांगता यावे 'स्वर्गात...'
मनामनातल्या गोष्टींसाठी
व्हावा असा तो 'कान...'
आयुष्याच्या डायरी खातर
जपले जाईल ते सुवर्ण 'पान...'
अश्या मनाचं झाड लावावं
अश्या मनाचं झाड व्हावं
सारीपाटातल्या जीवनासाठी
हरित गोजिरं रान असावं...
