STORYMIRROR

VIDYA BARGODE

Others

3  

VIDYA BARGODE

Others

जीवन जगायचे असते...

जीवन जगायचे असते...

1 min
259

जीवन जीवन जीवन... जीवन जगायचे असते,

कुठेतरी मध्येच एका वळणावर थांबून मागे वळून बघायचे असते.

काय मिळवलंय आपण? आणि काय हवे होते?

कुठे आलोय आपण? आणि आपल्याला कुठे जायचे होते?

किती वागलो बरोबर कोणाशी? आणि किती कुणाचा द्वेष केला?

काय दुरावलेले परत मिळाले? आणि कोण कुठे सोडून गेला?

किती जगलो स्वतःसाठी? आणि किती कुणाचा विचार केला?

कोण जगलं आपल्यासाठी? आणि कोणता क्षण आपल्याला मारून गेला?

किती वेळा मनापासून हसलो? आणि किती एकांतात रडलो?

किती वेळा सावरलं स्वतःला? आणि किती धडपडलो?

किती ही धडपडलो तरी पुन्हा उठायचे असते..

कारण, जीवन जीवन जीवन... जीवन जगायचे असते

मध्येच एका वळणावर थांबून मागे वळून बघायचे असते.


Rate this content
Log in