एक जग... या जगाच्या पलीकडले
एक जग... या जगाच्या पलीकडले
या जगाच्या पलीकडे ही एक जग असते..
प्रेमाच्या पलीकडे ही एक नाते असते..
हजार बंधने असूनही ते मुक्त असते ...
या जगाच्या पलीकडे ही एक जग असते...
प्रत्येक अश्रू म्हणजे दुःख नसते...
सुखात ही कोणीतरी रडत असते...
प्रत्येक अश्रुला आस मायेची असते...
या जगाच्या पलीकडे ही एक जग असते..
प्रत्येक मिठीत प्रेम नसते..
हास्यात ही कुणाच्या नाराजगी असते..
खरे प्रेम तर डोळ्यातच दिसते...
कारण या जगाच्या पलीकडे ही एक जग असते..
डोळ्यांना दिसते ते सत्य नसते..
बंद डोळ्यांनी ही खूप काही दिसते..
गरज फक्त मायेची असते...
या जगाच्या पलीकडे ही एक जग असते..
प्रत्येक डोळ्यांमध्ये स्वप्न नसते..
खोलवर पाहिले की पाणीच पाणी दिसते..
रात्र म्हणजे शांतता नसते..
कुणाच्या तरी मनात दुःखाचे वादळ असते...
हे जीवन इतके सोपे नसते..
इथे प्रत्येक हास्य हे हसू नसते.
कारण या जगाच्या पलीकडे ही एक जग असते....
