STORYMIRROR

Prasad Kulkarni

Others

4  

Prasad Kulkarni

Others

झेप

झेप

1 min
385

शेखचिल्ली तर ठरलेलाच आहे

नुसतीच झोपेत पाहिली जर स्वप्ने

नियोजन हवे प्रयत्नांचेही

नकोत नुसतेच परिश्रम व्यर्थपणे


नकोत नुसत्याच वायफळ गप्पा

नकोत फुकाची आश्वासने

नकोत अपयशाच्या हजार खेपा

एकच झेप घ्यावी यशस्वीपणे


आधी सुनिश्चित करावे लक्ष

अन् चहूकडचा माग काढावा 

सर्व तयारीनिशी झेपावे मग

गरुडाकडून हा धडा घ्यावा


आधी करावी स्वयंतयारी

अंतर अचूक ते ताडावे

पूर्ण शक्तीनिशी मारावा पंजा

वाघ चित्याकडून हेच शिकावे


शिडास थोडी गती मिळाया

तीर आधी तो त्यागावा

विमान अपुले हवेत तरण्या

मुक्काम भू वरचा हलवावा


झेप घ्यावी लक्ष्याकडे

आत्मविश्वासाचे भरून इंधन

सुयोग्य वेळ पाहुनी करावे

चिंतनरूपी मार्गावलोकन


Rate this content
Log in

More marathi poem from Prasad Kulkarni