STORYMIRROR

Mahesh vinayak panchabhai

Others

2  

Mahesh vinayak panchabhai

Others

जगा हो तु आता जागा हो

जगा हो तु आता जागा हो

1 min
112

जागा हो रे तु आता जागा हो,

डोक्यावर येऊन बसलेत आता तरी जागा हो,

जाती-वादी चा देश नाही तरी जाती साठीच भांडतो,

काय म्हणाव? पोटासाठीच तर लढतो,


कॉलेज मध्ये जातो तेव्हा इतरांपेक्षा जास्तच भरतो,

कसं नाही म्हणाव आता..

जातीवादीचा देश नाही तरी जातीसाठीच भांडतो,


जागा हो ओबीसी तू आता जागा हो,

तुझ्याच हक्कासाठी तु जागा हो


झाला आता स्वतःला "शेठ" समजून जास्तच भरतो....

शाळा एक शिक्षण एक आणि अभ्यासही बरं का ! जास्तच करतो,

पण तो एक नोकरीला जातो आणि मी रीकामाच फिरतो,

शेवटी मी नशिबाला दोष देतो,

आणि तो जातीचा अभिमान बाळगतो,


जातीवादी चा देश नाही तरी जतीसाठीच भांडतो,

काय म्हणावा शेवटी फरक जातीचाच पडतो.....


डोकं फोडून सांगतो उठ ओबीसी आता जागा हो,

सरकार बसवण्यात तुझाही मोठे योगदान होत,

निर्णय घ्यायला सरकारला ही अडचण वाटते पुन्हा सत्तेत बसायला खुर्ची उरते कि नाही उरते

सरकार बोलते विचार करतो तुमचा येऊ द्या पुढचे पाच वर्ष,


ओबीसी भुलू नको तू आता नाही येणार तुझ्यासाठी पुढचे पाच वर्ष

सरकार येईल आणि जाईल निर्णय निकाली नाहीच


जागा हो ओबीसी आता जागा हो,

हक्कासाठी लढायला तू खंबीर हो,


ओबीसी जागा हो आता जागा हो,

महासंघाचा एक धागा हो,

धागा धागा होऊन विणू एक दोरा,

जोमाने म्हणू ओबीसी चा नारा.

 "जय ओबीसी जय संताजी"


Rate this content
Log in