जात
जात
1 min
348
जातीचं भूत मानगुटीवर बसलं
माणसानं माणसाला खाली खेचलं
जन्मा आला माणूस म्हणून
जातीनं घेतलं स्वातंत्र्य हिरावून
शाळेत नाव घालताना लिहा म्हणलं मानव जात
पण सांगितलं ही तरतूद नाही कायद्यात
तू पाणी पितो मी पाणी पितो
मग जातीवाद त्यात कोठून शिरतो??
एक कळत नाही सगळ्याला
एकच लाल रंग रक्ताला
एकच पृथ्वी रहायला
एकच ऑक्सिजन श्वासाला
मग वेगळ्या जाती का लिहायला???
लिहू एकच मानव जात
नकोत भेदभाव वसुधेच्या घरात
नांदू सारे आनंदात
सोडून देऊ अभिशाप 'जात'
