आयुष्यातील विरामचिन्हे
आयुष्यातील विरामचिन्हे
1 min
598
उलगडत असता जीवन कोडे
वापरा विराम चिन्हे थोडे ।
छोट्या कारणांना द्या स्वल्पविराम
तर बिकट प्रसंगी अर्धविराम ।
काही प्रसंग घालावेत अवतरणात
तर काहींना मग उदगारात ।
कधी न चुकावे वेलांटी उकारात
जीवन अक्षर काढावे आकारात ।
जाणून घ्यावेत चढ उतार
योग्य असावा जीवन सार ।
नसावी रचना विखुरलेली
असावी अर्थपूर्ण होऊन फुललेली ।
योग्य वेळी द्यावा पूर्ण विराम
अवश्य घ्यावा थोडा आराम ।
विराम चिन्हांचा करून वापर
आनंद लुटावा जीवनाचा खरोखर .।👍👍
