STORYMIRROR

Prof. Sharda Khedkar

Children Stories Others

3  

Prof. Sharda Khedkar

Children Stories Others

*इवलुसे पिल्लू*

*इवलुसे पिल्लू*

1 min
12.1K


इवलुसे पिल्लू बसले होते झाडाखाली

आईची वाट बघत निवांत झोपले होते


इतक्यात पावसाचे थेंब अंगावर पडले

घाबरून पहुडलेले पिल्लू झटकन उठले.


इकडे तिकडे पळत भाबांवून थकले.

पावसाचे थेंब न थांबता कोसळत सुटले.


इवलुशा पिल्लाच्या डोक्यावर छत्री दिसली.

दादा म्हणू की ताई भिजलेले दिसली.


छोट्याशा घरट्यात पिल्लू ला नेले.

कुडकुडणाऱ्याा जीवाला मिठीत घेतले.


पावसाचे दूर जाणे हायसे वाटले 

ताईनेच पिल्लुला झाडावर बसवले


इवलेशा पिल्लाला शोधत आई ही आली.

घरट्यात एक एक दाना पिल्लाला भरी.


गुण्या गोविंदाने ताई दादा नाचू लागले

आईचे पिल्लावरचे प्रेम हे डोळ्याने पाहिले.


Rate this content
Log in