हयदी-कुकू
हयदी-कुकू
काय माय हयदी कुकाचा कार्यक्रम सांगु तुले,
नाव घेताना गंगी बई भलतीच येले.....
लावल तिले हयद-कुकू म्हतलं तिले नाव साग,
तिव्स गुईस खायाले गल्लीतले लेकर तिच्या माग........
ऊस, गाठे, गाजरं दिउन भरली तिची वटी,
तरी मले म्हने करत नई काय तुमच्या लेकराची लुटी.........
बसोलं बाई बारक्याले कपळे घालुन पिळ्यावर,
कईच नई पायलं माय सरे लेकरं त्याच्या आगावर..........
माई जऊ कोकी आली भलकशी नटून-थटून,
पदर घेतला तिन डोस्क्यावर तिचा गेला पदर फाटून.........
घेतलं गळव्यात पाणि तिचे धुतले ताटात पाय,
त्याच वाक्ती गण्याची आजी कमला आली माय...........
बाया लय पाऊन कम्ली बसली मोरच्या दारात,
अंदर झाकुन पाये म्हने कोनीच नईकाय घरात............
माया पोरीन लावल तिच्या डोस्क्याले हयद-कुकू,
पटकन नाव घे काका म्हने कमला काकू..............
नाव घेत्ल कम्लीन,
दिल्लीत व्हती गल्ली गल्लीत दिसला नाम्या,
तिसक्रातच्या बायन्यान तुले चकमा देल्ता रे शाम्या.......!!
