हो बोलून मोकळा
हो बोलून मोकळा
1 min
300
वेदना मनातील
मनातच दडल्या,
पूर्ण ताकदीनिशी
काळजाला रुतल्या. !! १ !!
घाव वर्मी लागता
अगणित या कळा,
घुसमटतो जीव
दाब पडता गळा. !! २ !!
हृदयी झाला छेद
काळीज दुभंगल,
छिन्न छिन्न विचित्र
सर्वत्र विखुरल. !! ३ !!
कल्पना नव्हतीच
कठीण असतात,
सुक्ष्म पिठासारखे
तुकडे करतात. !! ४
नको ठेवू दाबून
वेदना मनातल्या,
हो बोलून मोकळा
भावना साठलेल्या. !! ५ !!
