आईचा स्पर्श
आईचा स्पर्श
1 min
422
गर्भात होतो तुझ्या ग आई
जाणीव नव्हती त्या स्पर्शाची,
जन्म दिलास यातना सोसून
उमजली जाणीव मातृत्वाची...१
बालपणी रडताना मी आई
पाजल्यास धारा अमृताच्या,
स्पर्श होताच तुझ्या अंगाचा
जाणीला स्पर्श मी वात्सल्याचा...२
नाजूक मुलायम हात माझे
धरीता तू तुझ्याच हातात,
स्पर्श झाला माया ममतेचा
परीसस्पर्श रुजला मनात...३
भुकेच्या व्याकुळता रडे जीव
मोती घास भरवत्या हाताचा,
मांडीवर झोपवताना हळुवार
ओढून ऊब देणाऱ्या पदराचा...४
आजही आठवतात सारे स्पर्श
आता आलो जरी तरुणपणात,
फिटतील का पांग या स्पर्शाचे?
मनी आठवता नेई बालपणात...५
