STORYMIRROR

Makarand Pathare

Others

4  

Makarand Pathare

Others

ही वळणं अशीच असतात

ही वळणं अशीच असतात

1 min
441

एकमेकांसाठी रस्ते असले तरी,

काही प्रवास एकट्याचे असतात,

ही वळणं अशीच असतात....


हिरवळ दुतर्फा बहरली असली तरी,

मनं दुसऱ्या धुंदीत असतात,

ही वळणं अशीच असतात...


नजरेची नशा खोलवर असली तरी,

नाती खडतर उंचीवर असतात,

ही वळणं अशीच असतात....


प्रवास दूरवरचा वाटत असला तरी,

थांब्यावर फक्त आठवणीच असतात,

ही वळणं अशीच असतात...


अपेक्षांच ओझं वाहिलं असला तरी,

काही स्वप्न रस्त्यात सोडलेली असतात,

ही वळणं अशीच असतात..


प्रेम अबोला दुरावा एकाच गावात असला तरी,

असंख्य यातना आयुष्यभर रस्त्यातच असतात,

ही वळणं अशीच असतात...


 कडू गोड आठवणींचा काफिला मागे असला तरी,

 अंधार प्रकाश नवनवीन दिशा शोधतच असतात,

 ही वळणं अशीच असतात...


थकल्या पावलांचा प्रवास संपत आला असला तरी,

जुन्या पायवाटा नवीन प्रवासी घडवत असतात,

ही वळणं अशीच असतात...


Rate this content
Log in