Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Bharat Kakulate

Others

2  

Bharat Kakulate

Others

गुरू महती

गुरू महती

1 min
169


तुला करतो वंदन

काळजात रुतली तू,

तिला कष्टाची भाकरी,

जागा हृदयात केली तू ||१||


लढणार या जीवना

तुझा कृपाप्रसाद हा,

रस्त्यावर चालताना,

तोल जाईल कसा हा ||२||


माय माऊलीची छाया

शिक्षणाची तिला जाण,

मजुरीची आस तिला,

असे जीवनाचे भान ||३||


अशिक्षित माय माझी

नाही शिकली शाळा तू,

शिक्षणाचे वेड कसे,

मनात घर केलं तू ||४||


भाऊबंदकीचे प्रेम

आपसूक तुझ्या दारी,

तुझ्या शब्दात माझा मी,

झालो तुझा वारकरी ||५||


नाही कपट तुझ्या या

बोलण्या गुपित नसे,

वासराची जणू गाय,

भरवसा शेख? नसे ||६||


Rate this content
Log in