गझल... अजूनही
गझल... अजूनही
1 min
498
रणांगणामधे मला लढायचे अजूनही
रणात जिंकण्यास मज, झटायचे अजूनही...
नकोस दाखवू मला कधीच वाट चोरटी
बराच वेळ मज इथे, झुरायचे अजूनही...
मनातले तुझ्या खरे, तुझ्याकडेच ठेव तू
रणात डावपेच ओळखायचे अजूनही...
तुझ्याच पिंजऱ्यात "तू" रहायचे शिकून घे
युगे युगे इथे मला उडायचे अजूनही...
नसानसात वाहते, नवीन दुःख रोजचे
उदास पापण्यातुनी, कळायचे अजूनही...
चिता जळूनही अता , कशास राख जाळतो
जळून देह आतला जळायचे अजूनही..
असा कसा ठराव मांडलाय जिंकण्यास तू
लढून जिंकणे तरी, हरायचे अजूनही..
