घनतिमिर
घनतिमिर
1 min
252
ऐक,
तुला माहित आहे का?
कदाचित नव्हे,
नक्कीच तुला माहित नाही....
तू त्या पावसासारखा आहेस,
तुझं काहीच निश्चित नसतं,
तू समोर येताच,भरुन येत मनाचं आभाळ,
संपते उदासी आणि जडावलेपण
गच्च डबडबलेले माझे डोळे
रिते होऊ पाहतात तुझ्यात,
त्याक्षणी.....
अचानक बदलणाऱ्या मोसमा सारखा
चेहऱ्यावर ओढून हसू....
चटकन उभा राहतोस
आणि,
चलतो म्हणून पाठ फिरवतोस
मी जागीच उन्मळून पडते,
तेव्हा तू पाऊस नसतोस....
तर....
मनात खोल खोल रुतणारा,
घनतिमिर असतोस...
