STORYMIRROR

Gayatri Sonawane

Others

4  

Gayatri Sonawane

Others

घाबरते मी प्रेम करायला

घाबरते मी प्रेम करायला

1 min
450

मान्य आहे रे वेड्या.,

खूप प्रेम आहे तुझ माझ्यावर

जीव तर माझाही जडलाय तुझ्यावर

पण,नाही सहन करू शकणार मी

या समाजाच्या बोचक नजरेला

हो, घाबरते मी प्रेम करायला


उंचावलेल्या या खोट्या प्रतिष्ठेच्या बाजारात

नाही देऊ शकत मी तुझी साथ

एकट सोडून माझ्या माय बापाला

आपले म्हणवणाऱ्या आणि गैर असणाऱ्या

लोकांचे टोमणे ऐकायला

हो,घाबरते मी प्रेम करायला


सर्व समजतंय मी तुझा जीव आहे

माझ्यासोबत तुला जगायचंय

मलाही तर तुझ्याच नावाचं कुंकू लावायचयं

पण ज्या संस्कारांमुळे तू माझ्या प्रेमात पडलाय

ही लोकं काही कमी नाही करणार त्या संस्करांवर बोट उचलायला

हो, घाबरते मी प्रेम करायला


विश्वास आहे रे तुझ्यावर

नाही सोडणार तू मला एकट कोणत्याही हलातीत

पण मी आलीच तुझ्यासोबत

तर ही दुनिया जराही उशीर नाही करणारं

माझ्या घराला वाळीत टाकायला

आपल्या खर्या प्रेमाला

लफड म्हणुन बदनाम करायला

हो,घाबरते मी प्रेम करायला


आन्धुरलेल्या विचारांच्या या समाजात

नाही हिंमत होत आपल्या प्रेमाची ज्योत पेटवायला

नाही तोंड देऊ शकणार मी

माझ्या चारित्र्यावर घेतल्या जाणाऱ्या संशयाला

हो,घाबरते मी प्रेम करायला


Rate this content
Log in