Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gayatri Sonawane

Others

3  

Gayatri Sonawane

Others

व्यक्त होताना...

व्यक्त होताना...

1 min
473


चंद्र नभातुनी निघताना.,

सूर्य सांजेला मुकतांना...

अल्लड या वेड्या मनाशी.,

हितगुज करत होते मी.,

आज स्वता:कडेच व्यक्त होतांना........


माझ्या आशांना पायदळी उडवत.,

परक्या अपेक्षांसाठी,

स्वतःला विसरलेली मी.,

मोकळ्या मनाने हे सारं मांडत होते मी.,

आज स्वत:कडेच व्यक्त होतांना.....


बापाची लेक झाली,नवऱ्याची बायको झाली,

लेकरांना मायेची सावली दिली...,

यात कुठतरी दुमडलेली माझ्या अस्तित्वाची पाने.,

हळूच उलगडत होते मी..,

आज स्वत:कडेच व्यक्त होतांना.....


माझ्या असण्याला अर्थ आहे.,

माझ्या वाटण्याला अर्थ आहे..,

अर्थाला या माझ्या बेअर्थ करत आलेली मी,

करत होते ही फिर्याद आज...

स्वत:कडेच व्यक्त होताना......


घुटमळलेल्या या क्षणांची,

गुंतलेल्या या भावनांची.,

एक एक गाठ सोडवतांना.,

नकळत कागदावर शब्दांची माळ ओवत होते मी.,

आज स्वत:कडेचं व्यक्त होताना...


Rate this content
Log in