एकतर्फी प्रेम
एकतर्फी प्रेम
1 min
500
एकतर्फी प्रेम...
नक्की काय ते...?
त्याचकड़े हळूच पाहायचे त्याची नजर पडताच हळूच वळायचे,
आलाच अचानक समोर कधी
मनात फ़ुलणाऱ्या त्या पिसाऱ्याला हळूच आवरायचे।
रंगीबेरंगी स्वप्न मनी स्वतःच सजवायचे
येइल का आयुष्यात कधी? प्रश्नातच गुंतायचे,
त्या एका नजरेसाठी मनात झुरायचे।
नाही कळले त्याला जरी
त्याचासाठीच जगायचे...
एकतर्फी प्रेम हे एक तर्फीच असते।।
