एकदा वाटलं तुला स्पष्टच सांगाव
एकदा वाटलं तुला स्पष्टच सांगाव
1 min
355
एकदा वाटलं तुला स्पष्टच सांगावं
नंतर म्हंटल तुझं तुला कळतंय का पाहावं
तुला काय कळतच नव्हतं
माझं मन काय ऐकतच नव्हतं
पुन्हा म्हंटल आता तुला स्पष्टच सांगावं
पण आता वाटलं जरा वाट पाहून बघावं
वाट पाहण्यात अख्ख वर्ष निघून गेलं
तरी तुला काय कळतच नव्हतं
आता म्हंटलं तुला स्पष्टच सांगावं
ते सगळं कागदावर उतरवावं
तो कागद तुझ्या पर्यंत पोहचवावं
त्यातूनच तू माझं मन वाचावं
मग हळूच तुने माझ्याकडं बघावं
गालातल्या गालात हसावं
नजरा नजर होताच जरासं लाजावं
मग एका मिठीने तू होकार कळवाव
एकदा वाटलं तुला स्पष्टच सांगावं
एकदा वाटलं तुला स्पष्टच सांगावं
